पाचोरा, प्रतिनिधी । सन २०२१ च्या पवित्र हज यात्रेचा फार्म भरण्यासाठी लावण्यात आलेली आय. टी. रिर्टनची अट शासनाने रद्द करावी. या मागणीसाठी पाचोरा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसिलदार कैलास चावडे व उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांना निवेदन देण्यात आले.
सन २०२१ च्या पवित्र हज यात्रेचा फार्म भरण्यासाठी लावण्यात आलेली आय. टी. रिर्टनची अट शासनाने रद्द करावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना पाचोरा तालुका काँग्रेस कमेटीचे अल्पसंख्याक विभागाचे शे. शरिफ कादर खाटिक, काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष जळगाव निरीक्षक प्रकाश मुगदिया, अॅड. अमजद अहेमद पठाण, काँग्रेस आरोग्य सेवा सेल प्रदेश सरचिटणीस सचिन सोमवंशी, शिवाजी पाटील, प्रताप पाटील, इरफान मनयार, शेख आबीद अजीज, संगिता नेवे, कुसूम पाटील, अॅड. मनिषा पवार, विठ्ठलराव गुंजाळ, किशोर गरूड, प्रकाश चव्हाण, राजेंन्द्र महाजन आदी उपस्थित होते.