खामगाव, प्रतिनीधी । लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांचे पुण्यतिथी दिनी खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड. आकाश फुंडकर यांनी अभिवादन केले. यावेळी संपुर्ण फुंडकर कुटूंब उपस्थित होते.
अत्यंत भावूक असा हा क्षण होता. तीन वर्षापुर्वी अचानकपणे भाऊसाहेब आपल्या सर्वांना सोडून गेले. अचानक झालेल्या या आघातामुळे फुंडकर कुटूंबच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली होती. आजही भाऊसाहेबांच्या आठवणींमुळे प्रत्येकांच्या मनात ते जीवंत आहेत. स्व.भाऊसाहेबांनी आपले अख्ये आयुष्य़ रंजल्या गांजल्यांसाठी वेचले आहे. त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे ते समाधान करत. त्यांच्या केवळ आधाराने अनेकांच्या समस्यांचे निरसन होत होते. सर्वसामान्यांना केवळ भाऊसाहेबांच्या असण्यानेच नवीन उर्जा संचारत होती. भाऊसाहेब या नावांचा अनेकांना आधार होता. तेव्हा रंजल्या गांजल्यासाठी जीवन वेचना-या भाऊसाहेबांचा आदर्श समोर ठेवत सर्वसामान्य़ जनतेचे कार्य करा त्यांच्या समस्या सोडवा. यावेळी सुनिताताई फुंडकर, सागर फुंडकर, अपर्णा फुंडकर, हर्षलराव चोपडे, वसुंधरा हर्षलराव चोपडे, स्नेहा फुंडकर, व संपुर्ण फुंडकर कुटूंबीय उपस्थित होते.