जळगाव प्रतिनिधी । महानगरपालिकेच्या वतीने शहरात भुयारी गटारी आणि अमृत योजनेचे काम सुरू आहे. अशातच शहरातील स्वातंत्र्य चौकात आज सकाळी जेसीबीच्या मदतीने खड्डा खोदण्याचे काम सुरू असतांना खोदकामात कुदळ, पावडी, कढई आणि तगारी आदी जूने लोखंडी वस्तूंचे अवशेष सापडले आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून जळगाव शहरात भुयारी गटारीचे काम सुरू आहे. महापालिकेच्या विभागाने महात्वाच्या ठिकाणी व मुख्यरस्त्यांवर आता भुयारी गटारीसाठी खोदकामाला सुरूवात केली आहे. आज सकाळी १० वाजेच्या सुमारास शहरातील स्वातंत्र्य चौकात जेसीबीच्या माध्यमातून गटारी खोदण्याचे काम सुरू असतांना खड्ड्यातील जंग लागलेल्या लोखंडी कुदळ, टिकाव, बादल्या, कढई आणि टोपल्यांचे आवशेष निघाले आहे. विशेष म्हणजे एकाच ठिकाणी ह्या वस्तू आढळून आल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यावेळी परीसरात काही काळ नागरीकांची गर्दी झाली होती. साधारण १० फुट खोल ठिकाणी हे वस्तू सापडले आहे. यासर्व सापडलेल्या वस्तू पुरातन विभागाच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती महापालिका कर्मचारी सुबोध पाटील यांनी दिली.
https://www.facebook.com/508992935887325/videos/418671895903475