स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने मनसे राबविणार स्वच्छता मोहीम

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स  न्यूज प्रतिनिधी | भारताच्या ७५  वा स्वातंत्र दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शहरात तीन दिवस  स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मनसे उप महानगर अध्यक्ष आशिष सपकाळे यांनी केले आहे.

 

देशाचा स्वतंत्राचा अमृत मोहत्सव साजरा करत आहे. या  अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जळगाव शहरात शनिवार १३ ऑगस्ट पासून स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. यात १३ ऑगस्ट रोजी  काव्यरत्नवली चौक , १४ ऑगस्ट आकाशवाणी चौक तर स्वातंत्र्य  दिनी म्हणजेच  १५ ऑगस्ट ला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोर्ट चौक अशा तीन दिवस स्वछता मोहीम राबवण्यात येणार आहे. शहरातील काही भागात पावसामुळे खूप घाण आणि अस्वच्छता झाली आहे. तरी ह्या अनुषंघाने मनसे जळगाव शहरात स्वच्छता  मोहीम राबवणार आहे, तरी मनसेतील सर्वे अंगिकृत संघटना व आजी माजी  पदाधिकारी यांनी तसेच जळगावकरांनी  या ऐतिहासिक  स्वतंत्र दिनानिमित्त स्वच्छता  मोहिमेत  सहभाग नोंदवावा असे आवाहन उप महानगर अध्यक्ष  आशिष  सपकाळे यांनी  केले आहे.

 

Protected Content