स्क्वॅश ॲकॅडमीच्या १४ खेळाडूंची शालेय राज्यस्तर स्पर्धेत निवड

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगांव तसेच जळगांव जिल्हा हौशी स्क्वॅश संघटना, जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक विभागस्तर शालेय स्क्वॅश क्रीडा स्पर्धा २०२२-२३ चे आयोजन २८ ते ३० डिसेंबर २०२२ दरम्यान एकलव्य क्रीडा संकुलातील एकलव्य स्क्वॅश अॅकॅडमी येथे करण्यात आले होते.

स्पर्धेचे उद्घाटन के.सी.ई. सोसायटी संचालित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. आर. बी. ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जळगांव जिल्हा हौशी स्क्वॅश संघटनेचे सचिव डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, क्रीडा अधिकारी मीनल थोरात, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. प्रसाद देसाई, प्रा. उमेश पाटील व स्क्वॅश प्रशिक्षक प्रा. प्रविण कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रणजीत पाटील यांनी केले. स्पर्धेचे पंच म्हणून अनिरुद्ध जाधव, कु. वर्षा कुमावत, आकाश धनगर, तुषार पाटील, कु. कोमल पाटील, भगवान महाजन यांनी काम पाहिले.

स्पर्धेत १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील नाशिक, धुळे व जळगांव येथील एकूण १५८ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. एकलव्य स्क्वॅश अॅकॅडमीतील विजेत्या खेळाडूंना प्रशिक्षक प्रा. प्रविण कोल्हे यांचे मार्गदर्शन लाभले राज्य स्तर स्क्वॅश स्पर्धेकरिता एकलव्य स्क्वॅश अॅकॅडमीतील निवड झालेले खेळाडू खालील प्रमाणे

१४ वर्षे वयोगट मुली
1.आर्या देशपांडे
2.अनुष्का वाणी
3.व्रिती सोगती

१४ वर्षे वयोगट मुले
1.दक्षित महाजन
2.अथर्व खांडरे
3.तन्मय पाटील
4.यश हेमनानी

१७ वर्षे वयोगट मुली
1.गौरी खाचणे
2.हर्षिता पाटील

 

१७ वर्षे वयोगट मुले
1.यश पाटील
2.विवेक कोल्हे
3.सौम्य जैस्वाल

१९ वर्षे वयोगट मुले
1.देवेंद्र कोळी
2.गणेश तळेले

एकलव्य स्क्वॅश अॅकॅडमीतील विजयी खेळाडूंचे के.सी.ई. सोसायटीचे मा. अध्यक्ष श्री. नंदकुमार जी. बेंडाळे, के.सी.ई. सोसायटीचे कोषाध्यक्ष डी.टी. पाटील, मू. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स.ना. भारंबे व जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. मिलिंद दीक्षित यांनी अभिनंदन केले.

Protected Content