Home क्रीडा सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका

सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका


 

कोलकाता : वृत्तसंस्था । भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुलीला कोलकातामधील वुडलँड रुग्णालयात दाखले केले आहे. सौरवला सौम्य कार्डियक अरेस्ट झटका बसला आहे.

 

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला शुक्रवारी छातीत दुखू लागले. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. गांगुलीची प्रकृती सध्या स्थिर आहे. गांगुलीला किती वेदना होत आहेत हे आम्ही तपासत आहोत. यासाठी काही टेस्ट कराव्या लागतील. असे डॉक्टरांनी सांगितले

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गांगुलीच्या प्रकृतीसंदर्भात काळजी व्यक्त केली आहे. त्याच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.


Protected Content

Play sound