नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही सोशल मीडिया सोडू नका पण द्वेष करणं सोडा असा खोचक सल्ला देणारं एक ट्विट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण सोशल मीडिया सोडण्याचा विचार करतो आहे असं ट्विट केलं होतं. त्या ट्विटला राहुल गांधी यांनी उत्तर देत द्वेष सोडा सोशल मीडिया नका सोडू असा सल्लाही दिला आहे. दरम्यान, मोदी यांनी मी फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि यूट्युब सोडण्याचा विचार करतो आहे असं म्हटलं होतं. याबाबत मी रविवारी माझी भूमिका मांडणार असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं. आता रविवारी ते नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Give up hatred, not social media accounts. pic.twitter.com/HDymHw2VrB
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 2, 2020