सोलापूर (वृत्तसंस्था) कोरोनामुळे सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार युनूस शेख यांचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला आहे. शनिवारी अहवाल पॉझीटीव्ह आल्यामुळे एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. या घटनेने सोलापूरसह राज्यात खळबळ उडाली आहे.
शेख राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू मानले जात होते. शनिवारी त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. यानंतर तात्काळ त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, सोलापूर शहरात कोरोनाचे 41, तर ग्रामीण भागात 6 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 1 हजार 659 वर पोहचली आहे. आतापर्यंत सोलापूरमध्ये 143 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर तरी आतापर्यंत 836 जणांनी कोरोनावर मात केली आहे.