सोलापुरात अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार ; दहा जणांविरुद्ध गुन्हा

Rape Child crime

 

सोलापूर (वृत्तसंस्था) शहरातील विजापूर नाका परिसरात एका अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच संशयितांना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपीं फरार झाले आहेत. आरोपींनी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणांवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला होता.

 

पीडित तरुणी सोलापुरातील एका कॉलेजात शिकते. तिचे एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. या तरुणाचे इतर मित्र मागील जुलै महिन्यापासून तिच्यावर अत्याचार करत होते. विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असहाय्य अवस्थेत रडत असलेल्या या पीडितेची माहिती एका स्थानिकाने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासातून ही घटना उघडकीस आली. पीडित मुलीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. तर उर्वरित आरोपींचा शोध सुरु झाला आहे. बलात्कार करणारे बहुतांश आरोपी रिक्षाचालक असल्याचे कळते.

Protected Content