Home धर्म-समाज सोमय्या पिता-पुत्राच्या अडचणीत वाढ

सोमय्या पिता-पुत्राच्या अडचणीत वाढ

0
64


मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – भाजपचे किरीट सोमय्या यांच्या पाठोपाठ त्यांचा मुलगा नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे त्यामुळे किरीट सोमय्यांसोबत नील सोमय्यांच्याही अडचणीत वाढ झाली असून या दोघांवर अटकेची टांगती तलवार कायम असल्याचे दिसून येत आहे.

‘आयएनएस विक्रांत’ प्रकरणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी निधी जमा केला असून आर्थिक घोटाळ्याचे त्यांच्यावर आरोप आहेत. किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्यावर सेव्ह विक्रांतच्या नावे लोकांकडून गोळा केलेला मदतनिधी योग्य कामासाठी वापरण्यात आला नसल्याचे आरोप या दोघांवर आहेत. किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज अगोदरच फेटाळला असून किरीट सोमय्यांचा मुलगा नील सोमय्या यांचादेखील अटकपूर्व जामीन मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. नील सोमय्यांना दिलासा मिळेल अशी शक्यता व्यक्त होती. मात्र कोर्टाने ही शक्यता फोल ठरवत नील सोमय्या यांना दिलासा देण्यास नकार दिल्यामुळे नील सोमय्या यांची देखील अटकेची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई पोलीस तसेच राज्य सरकार हे तपास करु शकतात त्यासाठी ताबाही मागू शकतात असेदेखील मुंबई सत्र न्यायालयाने म्हटल्यामुळे सोमय्या पिता-पुत्रांना मुंबई उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे. अन्यथा त्यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.


Protected Content

Play sound