सोनियांची बैठक ; मुख्यमंत्र्यांची गैरहजेरी चर्चेत

नवी दिल्ली वृत्तसंस्था । काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडून बुधवारी राज्यांच्या जीएसटीतील वाटा, देशभरात जेईई एनईईटी परीक्षा स्थगित करण्यासहीत अनेक मुद्यांवर एक डिजिटल बैठक बोलावण्यात आली आहे.

या बैठकीसाठी मंगळवारी महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना संपर्क करण्यात आला होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र या बैठकीला उपस्थित राहू शकणार नाहीत. ममता बॅनर्जी यांच्यासहीत इतर मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहतील.

बुधवारी दुपारी २.३० वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांनी आपण या बैठकीला उपस्थित राहू शकत नसल्याचं कळवलंय. काँग्रेसकडून अनेकदा आग्रह करण्यात आल्यानंतरही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या बैठकीत सहभागी होणार नसल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे एका वेगळ्या चर्चेला आणि नव्या वादाला तोंड फुटलंय.

Protected Content