जळगाव प्रतिनिधी । सैनिक स्कुल सातारा पुढील वर्षाच्या सत्राच्या प्रवेश परिक्षेसाठी सहावी व नववी प्रवेश परिक्षासाठी १९ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन गृप कॅप्टन उज्ज्वल घोरमाडे यांनी केले आहे.
सैनिक स्कुल, सातारा येथील प्रवेशाची अधिसूचना बोर्ड ऑफ गव्हनर्स, सैनिक स्कूल सोसायटी, संरक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडू प्राप्त झाली आहे. सन 2021-2022 च्या सत्रामध्ये सैनिक स्कूल, सातारा येथे इयत्ता सहावी व नववीच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा रविवार, 10 जानेवारी, 2021 रोजी राष्ट्रीय परीक्षा एजन्सी यांच्यामार्फत घेण्यात येणार आहे.
उमेदवार केवळ ऑनलाईन पध्दतीने आपला अर्ज वेबसाईटवर 19 नोव्हेंबर, 2020 पर्यंत भरु शकतील. विविध प्रवर्गासाठी ऑनलाईन नोंदणी शुल्क एससी, एसटी प्रवर्गासाठी ४०० रुपये तर इतर सर्वासाठी ५०० रुपये आहे. समाजातील दुर्बल घटकातील आणि महाराष्ट्रातील मागसलेल्या भागातील जास्तीत जास्त मुलांनी याचा लाभ घ्यावा, असे उज्जवल घोरमाडे, (ग्रुप कॅप्टन) प्राचार्य यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.