यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज- अय्युब पटेल | येथील पंचायत समितीतील काही अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची सेवेची मुदत संपून देखील प्रशासकीय सेवेच्या नावाखाली तळ ठोकुन आहे. त्यामुळे अशांची तत्काळ बदली करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, यावल पंचायत समितीतील काही अधिकारी व कर्मचारी हे राजकीय व आर्थिक बळाचा वापर करून मागील दहा वर्षापेक्षा अधिक काळापासून पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात तळ ठोकुन राहात आहे. यामुळे ग्रामीण भागात विकासकांना खिळ बसली आहे. त्याचबरोबर यातील काही अधिकारी हे निवळ हजेरी मास्तर झाल्याची चर्चा सुरू आहे. यावल पंचायत समिती मध्ये प्रशासकीय सेवेचे सर्व नियम धाब्यावर टाकले असून अधिकारी व ग्रामसेवक एकाच ठीकाणी वर्षानुवर्षे कसे राहु शकता असा प्रश्न ग्रामीण पातळीवर ग्रामस्थांमध्ये उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया व गटविकास अधिकारी यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष केंद्रित करून तत्काळ सेवाकार्याची मर्यादा संपलेल्यांची इतत्र बदली करावी अशी मागणी तालुक्यातील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे .