पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा येथील बीएसएनएल कार्यालयात सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पेन्शन पुनर्रचना १ जानेवारी २०१७ पासून मिळावी, व १५ टक्के फिटमेन यासह विविध मागण्यांसंदर्भात धरणे आंदोलन करण्यात आले.
बीएसएनएल कार्यालयात सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पेन्शन पुनर्रचना १ जानेवारी २०१७ पासून मिळावी, व १५ टक्के फिटमेन यासह विविध मागण्यांसंदर्भात शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील मुख्य कार्यालयाच्या आवारात “पेन्शन रिव्हीजजन व पुनर्रचना झालीच पाहिजे”, “हमसब ऐक है”, “संयुक्त कृती समिती जिंदाबाद” अशा घोषणा देत सुमारे एक तास धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच गेल्या सहा वर्षांपासून मागण्या मान्य न झाल्याने काळा दिवस पाळण्यात आला. सदरचे आंदोलन सेवानिवृत्त अधिकारी तथा संघटनेचे सर्कल सचिव एम. एस. पाटील व शाखा सचिव विलास सदंनशिव यांचे नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी एम. एस. पाटील, एस. आर. पाटील, एकनाथ चौधरी, विलास संदनशिव, भास्कर पाटील, दिलीप पाटील, बाळू पाटील, अनिल बावचे, रवि पाटील, भडगांव सदस्य सलीम शाह, बळीराम पाटील, उत्तम पाटील, एस्. एम. पाटील, राजू शेख, यादव पाटील, नामदेव पाटील, रहिम भाई, भिमसिंग पाटील, पांडूरंग धनवडे, कुलकर्णी अप्पा, आशिष तोतला, समाधान चौधरी यांचेसह मोठ्या संख्येने बी. एस. एन. एल. चे सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते .