सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्ष करा ; खटुआ समितीचा अहवाल

 

पाचोरा, प्रतिनिधी । राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांचे सेवानिवृत्तीचे वय हे ६० वरुन ५८ करावे, अशी शिफारस खटुआ समितीने केल्याने समितीच्या या अहवालाचा राज्य सरकारी गट – “ड” चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

राज्य शासकीय अधिकारी कर्मचा-यांचे सेवानिवृत्तीचे वय केंद्राप्रमाणे ५८ वरुन ६० वर्ष करावे, या मागणीनंतर बी. सी. खटुआ यांच्या अध्यक्षतेखाली सन – २०१६ मध्ये समिती नेमण्यात आली होती. तब्बल चार वर्षांनंतर खटुआ समितीचा अहवाल बेजबाबदार पध्दतीने सादर करण्यात आला असुन या अहवालात राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वरुन ५८ वर्ष करावे, अशी शिफारस खटुआ समितीने केली आहे अशी माहिती चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी दिली.

खटुआ समितीच्या या शिफारसीचा हा अहवाल निषेधार्थ आहे. शासनाचा खर्च कमी करण्याचा हा प्रकार दात कोरून पोट भरण्यासारखा असुन समितीने राज्यातील भा.प्र.से. अधिका-यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० ऐवजी ५८ वर्ष करावे, व हा अहवाल तत्काळ फेटाळून लावावा, अशी मागणी भाऊसाहेब पठाण, भिकू साळुंखे, प्रकाश बणे, सुरेश अहिरराव, सुरेखा चव्हाण, मार्तंण्ड राक्षे व नाशिक जिल्ह्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांनी केली आहे.

Protected Content