सूशांतच्या प्रकरणात आदित्य ठाकरेंवर आरोप करणारे कोण, याची माहिती आपल्याकडे आहे : संजय राऊत

मुंबई (वृत्तसंस्था) सूशांतच्या प्रकरणात राजकारण होत आहे. पडद्यामागून पटकथा लिहिली जात आहे. हे राजकारण दळभ्रदी असून प्रतिमा मलीन करण्याचा डाव आहे. ज्यापद्धतीने आदित्य ठाकरेंच्या दिशेने आरोपांच्या फैरी झाडत आहात त्यांनी लक्षात ठेवा, आदित्य ठाकरेंवर आरोप करणारे कोण, याची माहिती आपल्याकडे आहे, लवकरच याचा स्फोट होईल, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांना दिला आहे.

 

 

राऊत पुढे म्हणाले की, सुशांत आत्महत्या प्रकरण बिहारविरुद्ध महाराष्ट्र रंगवले जात आहे. सीबीआयकडे हे प्रकरण सोपवावे, असे म्हणतात त्यांनी सीबीआय कशाला ट्रम्प यांच्या सीआयएकडे द्यावे, पुतीन यांच्याकडे द्यावे, युनोमध्ये प्रश्न उठवा, हा सर्व मुर्खपणा सुरु आहे. मुंबई पोलीस सक्षम आहेत, जगाचा मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर विश्वास आहे. इथलेच राजकीय नेते पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत आहेत. महाराष्ट्राशी इतकी बेईमानी याआधी कुणी केली नव्हती असा घणाघात राऊत यांनी विरोधकांवर केला आहे. तसेच हे संपूर्ण कारस्थान ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्यासाठी केले जात आहे. महाराष्ट्राविरोधात कोण कारस्थान करत आहे. राजकारण करत आहे, कशापद्धतीने राजकारण होत आहे आणि कोणत्या थराला जाऊन केले जात आहे. याचा लवकरच स्फोट होईल, खुलासा करण्यात येईल असा इशारा खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना दिला आहे.

Protected Content