सुशांत आत्महत्या : गृहमंत्र्यांनी बोलावली पोलीस अधिकाऱ्यांची बैठक, तपास सीबीआयकडे वर्ग होण्याची शक्यता

मुंबई (वृत्तसंस्था) सुशांत आत्महत्या : गृहमंत्र्यांनी बोलावली पोलीस अधिकाऱ्यांची बैठक, तपास सीबीआयकडे वर्ग होण्याची शक्यता अभिनेता सुशांत सिह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी गृहमंत्र्यांनी आज दुपारी ५ वाजेला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यासंदर्भात महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी ही बैठक बोलावली असल्याची चर्चा आहे.

 

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावल्याने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी पाटणा पोलिसात एफआयआर दाखल केल्यानंतर बिहारमधील ४ पोलिसांची टीम मंगळवारी मुंबईत दाखल झाली आहे. तर सुशात सिंह राजपूत कुटुंबीयांचे वकिल विकास सिंह यांनी असा आरोप केला आहे की, सुशांतच्या कुटुंबीयांना मुंबई पोलिसांच्या तपासाबाबत विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे याप्रकरणाची व्यवस्थित चौकशी आवश्यक असून आतापर्यंत कुणाला अटक झाली नाही, याबाबत खंत वाटत असल्याचे म्हटले. त्यामुळेच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यासंदर्भात चर्चा होणार असल्याचे कळते.

Protected Content