Home मनोरंजन सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा- शेखर सुमन

सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा- शेखर सुमन

0
47

मुंबई प्रतिनिधी । सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्या केली नसून त्याच्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी अशी मागणी ज्येष्ठ अभिनेते शेखर सुमन यांनी केली आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येने मनोरंजन क्षेत्र हादरले आहे. यावरून आता आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. या अनुषंगाने ज्येष्ठ अभिनेते शेखर सुमन यांनी या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, सुशांत हा संपूर्ण देश तुझ्यासोबत आहे. येथील प्रत्येक व्यक्ती तुझ्यासोबत आहे. आम्ही सगळे तुला न्याय मिळावा म्हणून प्रयत्न करतोय आणि हो तुला न्याय मिळेलच. सुशांत सिंह राजपूतने केलेली आत्महत्या ही साधी आत्महत्या होती असं घोषित करण्यात आलं आहे. पण त्यावर विश्‍वास ठेवू नका. मला शंका आहे. मी आपणा सर्वांना विनंती करतो, की या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणी करावी असे त्यांनी नमूद केले आहे.


Protected Content

Play sound