बीजिंग (वृत्तसंस्था) कोरोना रुग्णांचे नमूने नष्ट करण्यात आले. जैविक प्रयोगशाळांच्या सुरक्षेसाठी तसेच या अज्ञात रोगापासून अन्य कोणता धोका निर्माण होऊ नये, यासाठी हे नमूने नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची कबुली चीनने दिली आहे. त्यामुळे चीनने डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेला कोरोना रुग्णांची नमूने नष्ट केल्याचा दावा खरा ठरला आहे.
चीनच्या राष्ट्रीय स्वास्थ्य आयोगाचे निरीक्षक यू डेंगफेंग यांनी बिजिंग येथे पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, कोरोना रुग्णांचे नमूने नष्ट करण्यात आले. सार्वजनिक स्वास्थ्य कायद्यांतर्गत हे नमूने नष्ट करण्यात आले आहेत. दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पोम्पिओ यांनी चीन करोनाचा फैलाव सुरु झाल्याच्या सुरुवातीच्या दिवसांमधील घेण्यात आलेल्या कोरोना रुग्णांची नमूने देण्यास नकार देत असल्याचे म्हटले होते. सोबतच चीनने हे नमूने नष्ट केले असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता चीनकडून ही कबुली देण्यात आल्यामुळे अमेरिका खरं बोलत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, इतर देशांपासून करोनाची माहिती लपवण्याच्या हेतून हे नमूने नष्ट करण्यात आले नसून, जैविक सुरक्षेच्या हेतूनेच निर्णय घेण्यात आल्याचे यू डेंगफेंग यांनी यावेळी स्पष्ट सांगीतले.