सुरजदास स्वामी वडताल यांचे सत्संगाचा कार्यक्रम; हजारो भाविकांची उपस्थिती

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दहिगाव येथील महादेव व हनुमान मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात आयोजित श्री महाशिवपुराण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

 

यावेळी श्री महाशिवपुराण कथा प्रवक्ते सरजू दास जी स्वामी वडताल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले की, एक दिवसाची कथाही जिवात्म्यासाठी पुरेशी आहे. मंदिर हे साधनांचे स्थळ आहे. एक दिवसाची कथा सुद्धा जीवात्म्यासाठी पुरेशी आहे. मंदिर हे साधनांचे स्थळ आहे सत्संगाने ज्ञान प्राप्त होते आणि त्यातूनच जिवात्म्याचा विवेक होतो अंधाकारात अंधकार दूर होतो. शिव नाम हे पाप नाशक आहे, असे प्रतिपादन श्री महाशिवपुराण कथा प्रवक्ते सरजू दास जी स्वामी वडताल यांनी केले.

 

 

याप्रसंगी कथा श्रावण ऐेकण्यासाठी हजारो भाविकांची उपस्थिती असून कथेला भावनांच्या आनंदाने भाविकांची दाद मिळत आहेत. शिवपुराण कथा कानावर सुद्धा पडली तर ते पुण्याचे काम आहे. यासाठी शिवमृत शिवपुराण शिवकथा ऐकणे फार गरजेचे आहे. भगवंताच्या स्वरूपाचे जे सुख आहे ते यात मिळते. भगवंताची भक्ती करीत असताना मूर्तीला लेप दिला जातो. तो साफ करणे, सुद्धा आपलेच कर्तव्य आहे. दुसऱ्याच्या भावना दुखवणे हे महापाप आहे आणि सुखात सुख आपण समजणे हे पुण्य आहे. असेही या कथेद्वारे प्रबोधन करीत असताना शास्त्रींनी म्हटले.  कन्हैया व मीरा यांच्या भावगीतावर सदृश्य देखावा करीत उपस्थित त्यांनी नाच गाण्यात आनंद लुटला. यात गावातील हजारो भाविकांची उपस्थिती होती.

 

कार्यक्रम आयोजित करणाऱ्या पंच कमिटीच्या वतीने मोठ्या उत्साहाने उपस्थितांची बैठक व्यवस्था करण्याचे परिश्रम घेतलेले आहे व्यासपीठावर प्रेमप्रकाशदास व राकेश प्रसाद महाराज आदी शास्त्रीजींनी या कथेला उपस्थित होते.

Protected Content