पारोळा प्रतिनिधी । खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त येथील नगरपालिकेच्या ३५ सफाई कामगार महिलां भगिनींचा सॅनिटायझर आणि मास्क वाटप करून सत्कार करण्यात आला.
सौ. रूपाली चाकणकर यांच्या निर्देशानुसार जळगाव जिल्हा महिला अध्यक्ष सौ कल्पनाताई पाटील व माजी पालकमंत्री तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ सतिश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी नगरपालिकेच्या ३५ सफाई कामगार महिलां भगिनींचा सॅनिटायझर आणि मास्क वाटप करून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला सुवर्णा पाटील, अन्नपुर्णा पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.