सुप्रिम कॉलनीत दोन गटात तुंबळ हाणामारी, चॉपरसह लाठ्याकाठ्यांचा वापर; तीन जण जखमी

जळगाव प्रतिनिधी । शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत दोन्ही गटाकडून चॉपर व लाठ्याकाठ्यांचा वापर करण्यात आला. ही घटना आज दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली. दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध तक्रार दाखल केल्याने दोन्ही गटाविरुद्ध परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोन्याची चैन हिसकवून चॉपरने भोसकले
जखमी विशाल अहिरे यानी दिलेल्या फिर्यादीवरुन माहिती अशी की, विशाल राजू अहिरे (२८, रा. रामेश्वर कॉलनी) हा किरण गव्हाणे, आशू मोरे, विशाल पाटील, दिपक तरटे यांच्यासोबत कुसूंबा येथे अंत्यसंस्कारासाठी गेला होता. अंत्यसंस्कार आटोपून तो (एमएच १९ डीपी ००२३) क्रमांकाच्या मोटारसायकलने घराकडे जात होता. याचवेळी मागून स्विफट कारमध्ये आलेल्या किरण खर्चे (रा.२७, नितीन साहित्यानगर), आकाश परदेशी, छोटा किरण (पूर्ण नाव माहित नाही) यांच्याह दोन जांनी विशालला थांबवित आम्हाला खून्नस देतो असे म्हणत चॉपरने विशालवर वार केले. यावेळी त्याच्या सोबत असलेल्यांनी देखील दगड व लोखंडी रॉडच्या सहाय्याने विशाल व किरण गव्हाणे यांना बेदम मारहाण केली. मारहणी दम्यान, किरण खर्चे याने विशालच्या गळ्यातील आठ ग्रॅम सोन्याची चैन लंपास केली असून किरण खर्चे, आकाश परदेशी, छोटा किरण यांच्यासह दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चॉपरने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न
जखमी किरण खर्चे याने दिलेल्या फिर्यावरुन किरण हा त्याचा मित्र किरण चितळे याच्यासोबत (एमएच १९ ०७५७)क्रमांकाच्या मोटारसायकलने कुसूंबा येथे मित्राच्या अंत्यविधीसाठी गेला होता. अंत्यविधी आटोपून तो घरी परतत असतांना विशाल अहिरे, किरण गव्हाणे, गौरव सपकाळे, दीपक तरटे, राकेश सपकाळे याच्यासह दोन जणांनी किरणच्या गाडीसमोर आडवे येत त्यांना शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली. याचवेळी विशाल अहिरे याने किरणच्या डोक्यावर व कानावर चॉपरने वार करुन त्याला गंभीर जखमी केले. तसेच त्याच्यासोबतच्या असलेल्यांनी देखील त्या लोखंडी पाईप व दगडांनी किरण व त्याच्यासोबतच्यांना मारहाण करीत गंभीर जखमी केलेे. यावेळी किरण चितळे याने किरणला तात्काळ रिक्षात टाकून खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केल. याप्रकरणी किरण खर्चे याच्या फिर्यादीवरुन विशाल अहिरे, किरण गव्हाणे, गौरव सपकाळे, दीपक तरटे, राकेश सपकाळे याच्यासह दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही गटांची अंत्यविधीसाठी उपस्थिती
तालुक्यातील कुसूंबा येथे एका तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याने दोन्ही गट कुसूंबा येथे अंत्यविधीसाठी गेले होते. याठिकाणी दोन्ही गटांकडून खुन्नस दिली जात असल्याने अंत्यविधी आटोपल्यानंतर दोन्ही गट कुसुंबा टोलनाक्याजवळ समोरासमोर भिडले. या घटनेत दोन्ही गटाकडून चॉपरसह लाठ्याकाठ्यांचा वापर करण्यात आला.

Protected Content