भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान जळगाव अंतर्गत महिला दिनानिमित्त सुंदर हस्ताक्षर व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. बालविकास प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदवला.
पहिली ते चौथीचे विद्यार्थ्यांनी आई व माझे आदर्श या विषयावर निबंध व हस्ताक्षर सादर केले होते. मेडल व प्रमाणपत्र वितरण निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या उपशिक्षिका सुनिता सुर्यवंशी मॅडम तर आभार प्रदर्शन श्रीमती अर्चना खांडेकर मॅडम यांनी केले. विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका भारती रामकुवर, नेहा मालपुरे सर्व शिक्षक वृंद, पालक वर्ग किशोर पाटील व समाधान भोई तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.