नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील शालेय परीक्षांबरोबरच सीबीएसई बोर्डाच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर आयसीएसई बोर्डानेही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेत असल्याची माहिती केंद्राचे सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात दिली आहे.
रद्द झालेल्या परीक्षा सुधारित वेळापत्रकानुसार सीबीएसई बोर्डाने दहावी-बारावीच्या परीक्षा १ ते १५ जुलैदरम्यान घेण्याचे निश्चित केले होते. मात्र, देशातील करोना परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १ ते १५ जुलै दरम्यान घेण्यात येणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून, विद्यार्थ्यांना मागील तीन वर्गात मिळालेल्या गुणांचे मूल्यमापन करून गुणदान केले जाणार आहे. सीबीएसईबरोबरच आयसीएसई बोर्डानंही दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिली. मात्र, बोर्डाने दिलेल्या गुणांवर समाधान न झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यास बोर्डाने नकार दिला आहे, असेही मेहता यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या याचिकेवर उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे.