जयपूर वृत्तसंस्था। सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी व्यवहार्य नसल्याचे सांगत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी यावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
राजस्थानची राजधानी जयपूरमधल्या शहीद स्मारक परिसरात सीएए, एनआरसी विरोधात आंदोलन सुरू आहे. काल रात्री गेहलोत आंदोलनस्थळी पोहोचले. त्यावेळी त्यांनी आंदोलकांशी संवाद साधतांना केंद्र सरकारवर टीका केली. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आम्हाला मान्य नाही, असं म्हणत गेहलोत यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. काँग्रेस देशवासीयांसोबत असल्यानं चिंता करण्याचं कारण नाही. कोणालाही डिटेन्शन सेंटरमध्ये पाठवण्यात येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी करू नये, असं आवाहन त्यांनी केलं. डिटेन्शन सेंटरमध्ये जाण्याची वेळ आलीच, तर त्यावेळी सर्वात पुढे मीच असेन, अशी ग्वाही त्यांनी दिली.