मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची (सीआयडी) वेबसाइट हॅक झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
सीआयडीची वेबसाइट हॅक करणाऱ्या हॅकर्सने दिल्लीतील हिंसाचारादरम्यान मुस्लिमांवर हल्ले झाल्याचे म्हणत मोदी सरकार आणि पोलीस विभागाला इशारा दिला आहे. यावरून हॅकर्स हिंदू-मुस्लीम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट आहे. दरम्यान,वेबसाइट हॅक करणारे कोण? आहेत हे अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.