सिलिंडरच्या किमतीत २५ रुपयांची वाढ

 

मुंबई, वृत्तसंस्था । मागील दहा दिवसात पेट्रोल आणि डिझेल यांच्या दर वाढी नंतर केंद्र सरकारने  गुरुवार ( दि. २५ फेब्रुवारी) रोजी पुन्हा  सिलिंडरच्या किमतीत २५ रुपयांची वाढ केली आहे. या दरवाढीमुळे जनतेवर आर्थिक बोजा पडणार आहे. 

केंद्र सरकारने घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत गुरुवारी २५ रुपयांची वाढ केली आहे. दहा दिवसांत दुसऱ्यांदा सिलिंडर महागला असून तो ७९४ रुपयांच्या विक्रमी पातळीवर गेला आहे. ही दरवाढ अनुदानित आणि विनाअनुदानित सिलिंडरवर करण्यात आल्याचे पेट्रोलियम कंपन्यांनी म्हटलं आहे. या दरवाढीची २८ कोटी ७० लाख एलपीजी ग्राहकांना झळ बसणार आहे. दहा दिवसांत सिलिंडर पाऊणशे रुपयांनी महागला आहे. या आधी १५ फेब्रुवारी रोजी सिलिंडर ५० रुपयांनी महागला होता. मुंबईत गॅस सिलिंडरसाठी आता ग्राहकांना ७९४ रुपये मोजावे लागतील. याआधी सिलिंडरचा भाव ७६९ रुपये होता. दरम्यान, डिसेंबरनंतर गॅस सिलिंडरच्या किमतीत झालेली ही पाचवी दरवाढ आहे.

 

Protected Content