ईनरव्हील क्लबतर्फे हळदी कुंकू व कट्टा लोकार्पण

 

चोपडा प्रतिनिधी  । येथील ईनरव्हील क्लबतर्फे यंदाही मकरसंक्रांत निमित्ताने हळदी कुंकू व  कट्टा लोकार्पण कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता. 

हरेश्वर मंदिर परिसरात झालेल्या एका कार्यक्रमात हळदी कुंकू सोबत आमदार लता सोनवणे यांच्या निधीतून ईनरव्हील क्लबतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या ‘ईनरव्हील फारेस्ट व बालोद्यान’ मध्ये समर्पित सिमेंटच्या तीन बाकांचे उद्घाटन (कट्ट्याचे) लोकार्पण क्लबच्या डिस्ट्रिक्ट व्हाईस चेअरमन  अश्विनी गुजराथी यांच्या हस्ते करण्यात आले. हळदी कुंकू व कट्टा लोकार्पण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्लब अध्यक्षा शैला सोमाणी होते. याप्रसंगी डिस्ट्रिक्ट चेअरमनपदी अश्विनी गुजराथी यांच्या निवडीबद्दल क्लबच्या वतीने अध्यक्ष शैला सोमाणी यांच्या हस्ते शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रा. सविता संजय सोनवणे यांना कवियत्री बहिणाबाई चौधरी उमवि तर्फे डॉक्टरेक्ट  पदवी मिळवल्याबद्दल डि.चेअरमन अश्विनीबेन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  कार्यक्रमात भगिनींनी विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले, तर अश्विनी गुजराथी व माजी अध्यक्ष डॉ. कांचन टिल्लू यांनी नवीन सदस्यांनी क्लबच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करित क्लबच्या कार्याची माहिती दिली. क्लबच्या कट्टा उभारणीने मंदिर परिसरात येणाऱ्या भक्तांच्या व वयोवृद्ध मंडळींची बैठकीची सोय झाली आहे. या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होते आहे. याप्रसंगी मंजु अग्रवाल, अंकिता जैन, सरला राजपूत, किरणताई पालीवाल, नितू अग्रवाल, उर्मिला राजपुरोहित, रूपाली काबरा, चेतना बडगुजर, ज्योती वारके, रोहिणी देशपांडे आदी सदस्य उपस्थित होते. प्रारंभी क्लब अध्यक्ष शैला सोमाणी यांनी सर्वांचे स्वागत केले, तर सेक्रेटरी अंकिता जैन यांनी आभार मानले. 

Protected Content