रावेर प्रतिनिधी। विना परवानगी लाकडे घेऊन मध्य प्रदेशकडे जाणार्या दोन ट्रकांना यावल वन विभागाच्या गस्ती पथकाने पकडले असून ही कारवाई चोरवड नाक्या नजिक केली असून दोन्ही ट्रक रावेर वनक्षेत्रात जप्त करण्यात आली आहे.
या बाबत वृत्त असे की पेरूच्या लाकडांनी भरलेला ट्रक क्र एमएच १९ झेड ०५५७ तर लिंबाच्या लाकडांनी भरलेला ट्रक क्र एमपी ०७ जि ५९७० हे मध्यप्रदेश कडे जात असल्याची गुप्त माहिती वन खात्याला मिळाली होते. यानुसार यावल वनक्षेत्रपाल फिरते गस्त पथकचे विशाल कुटे, वनरक्षक रवी पवार,वनपाल पाटील यानी सापळा रचुन दोन्ही ट्रक महाराष्ट्र सिमा ओलांडवुन मध्य प्रदेश सिमेत घुसण्या आधी पकडले आहे दोन्ही ट्रक्समधील लाकडांचा पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास वनपाल अतुल तायडे हे करत आहेत.