सिनेट पदवीधर मतदार नावनोंदणीसाठी १८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे सिनेट निवडणुकीच्या पार्श्वभूमूवर पदवीधर मतदान नावनोंदणी सुरु आहे. नवीन मतदार नावनोंदणीसाठी १८ ऑगस्ट २०२२ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

बऱ्याच पदवीधारकांकडे पदवीधर प्रमाणपत्र नाही आहे, त्यांना पदवी प्रमाणपत्र काढण्यासाठी सुमारे एक महिन्याचा कालावधी लागत आहे. नावनोंदणी ऑनलाईन असल्याने अनेक वेळा फॉर्म भरतांना सर्व्हर बंद पडत आहे, अतिवृष्टीमुळे काही भागात वीजखंडीत होत असल्याने फॉर्म भरणे अवघड घेत आहे. जास्तीत जास्त पदवीधारकांना नोंदणी करता यावी म्हणून विद्यापीठाने मुदत वाढ द्यावी या विषयाचे निवेदन युवासेनेतर्फे कुलगुरू डॉक्टर विजय माहेश्वरी यांना देण्यात आले. डॉक्टर माहेश्वरी यांनी सकारात्मक प्रतिसाद व आश्वासन दिले.

या वेळी युवासेनेचे विभागीय सचिव विराज कावडीया, महानगर युवाधिकारी विशाल वाणी, उप-जिल्हा युवाधिकारी पियुष गांधी, अमोल मोरे, अंकित कासार, अमित जगताप, यश सपकाळे, प्रीतम शिंदे, यश लोढा आदी उपस्थितीत होते.

 

 

Protected Content