लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त गोदावरी फाउंडेशनतर्फे अभिवादन

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज सोमवारी (१ ऑगस्ट) गोदावरी फाउंडेशन तर्फे अभिवादन करण्यात आले.

गोदावरी फाऊंडेशन चे अध्यक्ष डॉ उल्हास पाटील सर, कान नाक घसा विभाग प्रमुख डॉ. अनुश्री अग्रवाल यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार वाहून अभिवादन करण्यात आले. यावेळी महापुरुष टिळक यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.

याप्रसंगी डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, डॉ.माया आर्वीकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, डॉ.नेहा वझे महाजन, डॉ.जयंत देशमुख, कान नाक घसा विभागातील डॉ.विक्रांत वझे, डॉ पंकजा बेंडाळे, पॅथोलॉजी डॉ.शिरीष गोंडाणे, डॉ.वैशाली राठोड, डॉ कैलास वाघ, ब्लड बँकेचे डॉ.भारंबे, रेसिडेंट डॉ.हर्षल महाजन, डॉ.श्रुती खंडागळे, जेआर डॉ.चारू, नर्सिंग ऑफिसर संकेत पाटील, मनीषा खरात, कीर्ती पाटील आदी उपस्थित होते.

Protected Content