सिक्किमच्या सीमेवर भारतीय-चीनी सैनिक भिडले

गंगटोक (वृत्तसंस्था) सिक्किममधील भारत-चीन सीमेवर शनिवारी भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यात दोन्ही बाजूंचे सैनिक किरकोळ जखमी झाले असून या घटनेमुळे सीमेवर वातावरण गंभीर झाले आहे.

 

उत्तर सिक्कीममधील नाकू ला सेक्टर येथे शनिवारी ९ मे रोजी दैनंदिन गस्त घालत असतानाच दोन्ही देशाचे सैन्य अधिकारी आमनेसामने आले आणि त्यांच्यात ही तणावाची परिस्थिती उदभवली. हा वाद मिटवला गेला खरा पण, त्यामुळे वातावरण गंभीर झाले होते. यात दोन्ही बाजूंच्या सैनिकांना किरकोळ दुखापत झाली. या संघर्षादरम्यान, भारतीय आणि चिनी सैनिक आक्रमक झाले होते. मात्र, नंतर स्थानिक पातळीवरील चर्चेनंतर सैन्य मागे घेण्यात आल्याचे वृत्त आहे. मुख्य म्हणजे हा भाग कोणत्याही प्रकारच्या रस्त्याने जोडलेला नसून, तेथे हॅलिकॉप्टरने देखरेख केली जाते.

Protected Content