चोपड्यात ‘आयटक’तर्फे कामगारांसाठी उद्या ‘मागणी दिवस’ पाळण्याचे आवाहन

चोपडा प्रतिनिधी । राज्यातील संघटित व असंघटित कामगारांच्या विविध मागण्यांसाठी उद्या ११ मे रोजी ‘मागणी दिवस’ पाळण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य आयटक यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

आयटकच्या मागण्या –
* परत जाऊ इच्छिणाऱ्या स्थलांतरित कामगारांना परतीची हमी निर्माण करा.
* परतीवरच्या कामगारांकडून भाडे वसूल करणे बंद करा व उलट त्यांना प्रवास खर्च द्या.
* रेशन सर्व गरजू कुटुंबांना पुरवा, त्यासाठी अंत्योदय, बीपीएल, एपीएल कार्डासारख्या कोणत्याही अटी ठेऊ नका.
* सार्वजनिक वितरण व्यवस्था सार्वत्रिक करा.
* उज्वला योजना सर्व कामगार कुटुंबांना लागू करा, ज्यांनी स्वतंत्र गॅस घातले त्यांनाही अनुदान द्या.
* कामगारांचा पगार बंद होणार नाही किंवा पगार कपात होणार नाही याची हमी निर्माण करा.
* कोविद-१९ साथीचे निमित्त करून कामगार कायद्यांत मालकधार्जिणे बदल करणे खपवून घेतले जाणार नाही
* किमान रु.५७००/- दर महा, प्रत्येक कामगार कुटुंबाच्या खात्यात, त्यांना परत काम मिळेपर्यंत, निदान तीन महिने जमा करा.
* कोविद-१९ साथीत अग्रभागी राहतं काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना संरक्षक साहित्य पुरवा.
* सरकारी व सार्वजनिक उद्योगातील कर्मचार्यांनी कोविद-१९ साथीत केलेल्या कामाला दाद द्या.
* सरकारी कर्मचारी व निवृत्ती वेतन धारकांचा महागाई भत्ता रोखू नका, इपीएस ९५ पेन्शनर्स ला आर्थिक मदत द्या
* स्थलांतरित कामगार कायदा, १९७९ मजबूत करा, जेणेकरून त्यांना योग्य ते संरक्षण मिळेल काम मिळण्याची स्थानिक पातळीवर हमी द्या.
* उद्योग परत सुरू झाल्यावर मालकांनी त्यांच्या कामगारांना मास्क, साबण, पाणी व सॅनिटायझर उपलब्ध करून देणे, त्यांच्यावर बंधनकारक करा.
* पि.एम.केअर्स फंडाचे कामकाज पारदर्शी करा.

यांच्यासाठीही मागणी
कोरोना योध्ये डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आशा, आशा गट प्रवर्तक, अंगणवाडी कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, शालेयपोषण आहार कर्मचारी,वीज कर्मचारी, बँक, एलआयसी कर्मचारी, अंबुलन्स वाहनचालक, हातपंप दुरुस्ती देखभाल कर्मचारी, अंशकालीन स्त्री परिचर, पत्रकार, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयतील महसूल कर्मचाऱ्यांना सन्मानाची माणूसकीची वागणूक द्या.

*सीआरपीएफ, एलसीआरपी यांच्या मागण्यांकडे शासनाने लक्ष दयावे. कंत्राटी, मानधनावर कार्यरत कर्मचारी कामगारांना कायम करा. किमान वेतन २१ हजार रूपये द्या. ग्रामपंचायत कर्मचारी यांचे थकीत पगार द्या. डाटा ऑपरेटर, रोजगार सेवक कायम सेवेत घ्या, तरी जळगाव जिल्ह्यातील कर्मचारी यांनी ‘मागणी दिवस’ पाळण्याचे आवाहन संघटनेने केले आहे.

यांनी केली मागणी
राज्य सरचिटणीस श्यामजी काळे, राज्याध्यक्ष सी.एन.देशमुख, उपाध्यक्ष अमृत महाजन, राजेंद्र झा, जे.एन.बाविस्कर, आयटक महाराष्ट्र जळगाव जिल्हा पदाधिकारी संतोष खरे, लक्ष्मण पवार, संदीप देवरे, सुभाष कोळी, मीनाक्षी सोनवणे, सुलोचना साबळे, शालिनी पाटील, मनीषा पाटील, वत्सला पाटील, प्रेमलता पाटील, ममता महाजन, उद्धव सांगोरे, किशोर भंडारे, गौरवसिंग पाटील, मीना काटोले, मंगला शिवदे, अश्विनी देशमुख आदींनी केले आहे.

Protected Content