सिंधी कॉलोनी येथे आरोग्य तपासणी शिबीर

जळगाव, प्रतिनिधी | अखंड सिंधी सेवा फाउंडेशन आणि नीरजरा फाऊंडेशन आणि नेत्र ज्योती हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने संत कँवराम नगर,सिंधी कॉलोनी येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

 

रविवार १४ नोव्हेंबर रोजी आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन माजी मंत्री डॉ गुरुमुख जगवानी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी नरेश तोलानी होते. मुख्य अतिथी म्हणून प्रकाश आडवाणी , डॉ मूलचंद उदासी , घनश्यामदास अडवाणी , कन्हैयालाल संगतानी , नगरसेवक भगत बालानी , करमपुर पंचायत अध्यक्ष राजकुमार वालेचा , अमर शहीद संत कँवरराम साहेब अध्यक्ष दयानन्द विसरानी , नगरसेवक मनोजआहूजा , अखंड सिंधी सेवा फाउंडेशन अध्यक्ष हरीश तलरेजा उपस्थित होते.

या शिबिरात थैलेसीमिया, डोळे आणि दात तपासणी करण्यात आली तसेच रक्तदान शिबिरही आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून थॅलेसेमिया रुग्णांसाठी रक्तदान शिबिरही आयोजित करण्यात आले होते. थायरोकेअर आणि माधव गोळवलकर रक्त स्वयंसेवी रक्तपेढी यांनी आरोग्याशी संबंधित सेवा संस्थेला हातभार लावला. थैलेसीमिया शिबिरात १७७ जणांची तपासणी करण्यात आली तर २० जणांनी रक्तदान केले. आरोग्य शिबिरात १९० जणांची डोळ्यांची तपासणी तर ६० जणांची दंत तपासणी करण्यात आली. शिबिरात अमूल्य सहकार्य,पूज्य जळगाव सेंट्रल पंचायत आणि संत कंवरराम ट्रस्ट, व सामाजिक कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले. थॅलेसेमिया शिबिर स्व श्री: दादा थदारामजी तोलानी यांना समर्पित होते.

शिबिरास डॉ. हेमंत पाटील, दर्शनलाल वालेचा , नंदू आडवाणी, हरीश माधवानी , शैलेश सिरसाठ , डॉ. पूनम मोतीरमानी, अखंड सिंधी सेवा फाउंडेशन चे उपाध्यक्ष मुरली गुरदासानी, PRO शोभा भागिया, मेंबर्स अनिल हिरननंदनी, मनोहर कृष्णानी, कैलाश वालेचा, नरेश नागवानी, अनिल चाँदवाणी,आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन महासचिव प्रा. डॉ संतोष खत्री यांनी तर आभार संजय हिरानी यांनी मानले.

Protected Content