बुलढाणा अमोल सराफ । जागतिक महिला दिनानिमित्त राजमाता जिजाऊ यांचे माहेर बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथून सावित्रीबाई फुले स्मृतीज्योत ही सावित्रीबाईंच्या स्मृतिदिनी १० मार्चला साताऱ्यातील नायगावला दरवर्षी जात असते. सावित्रीबाई फुले यांचे कर्तृत्व, त्याग आणि त्यांचे कार्याची जाणीव ठेवत सावित्रीबाईंच्या जन्मगावी या स्मृतीज्योतचे आयोजन करण्यात आले.
संपूर्ण राज्यभरातून नायगाव ला सावित्रीबाईंच्या पुण्यतिथीला या दिवशी लोक जमतात आणि सावित्रीच्या विचारांची देवाणघेवाण करतात. दरवर्षी सिंदखेड राजवरून ४५० किमीचा प्रवास करत आणि ६ जिल्हे पार करत ३ दिवसानंतर हि ज्योत नायगावला जातेय. त्याठिकाणी जाताना ठिकठिकाणी या ज्योतीचे स्वागत करत आणि अभिवादन करत नंतर समारोप केलेय जातोय. ज्या सावित्रीने शिक्षणाची गंगा आणली आणि त्यामुळे अनेक महिला या मोठमोठ्या पदावर आहेत, त्यामुळे सावित्री सृष्टी नायगावला निर्माण व्हावी, तर त्या ठिकाणी सावित्रीच्या विचारांच्या पुस्तकांचे संग्रहालय त्याठिकाणी व्हावे, या उद्देशाने या ज्योतीच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी या ज्योतीचे आयोजन करण्यात येतेय. यावेळी सावित्रीबाईचे पूजन करून रथाची मिरवणूक काढणायत आली आणि नंतर स्मृतीज्योत हि पुढील गावासाठी रवाना झाली.