सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची विष घेवून आत्महत्या; पतीसह दोघांना अटक

सावदा ता. रावेर प्रतिनिधी । दोन लाख रूपयांसाठी सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या मारहाण व मानसिक त्रासाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने विष घेवून आत्महत्या केल्याची घटना रावेर तालुक्यातील रायपूर येथे घडली. याप्रकरणी पतीसह सासू-सासऱ्यावर सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, रावेर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवाशी प्रभाकर काशीनाथ पाटील (वय-४०) यांची मुलगी कोमल चेतन पाटील (वय-२०) रा. रायपुर ता.रावेर हिचा विवाह तालुक्यातील रायपूर येथील चेतन गोपाळ पाटील यांच्याशी झाला. कोमलचे पती चेतन पाटील हे औष्णीक विद्यूत केंद दिपनगर येथे नोकरीला आहे. नोकरी कायमस्वरूपी व्हावी यासाठी कोमलने माहेरहुन दोन लाख रूपये आणावे म्हणून तिचा मानसिक व शारिरीक छळ करण्यास सुरूवात केली. दरम्यान सासु जिजाबाई गोपाळ पाटील आणि सासरे गोपाळ देवचंद पाटील हे देखील मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून कोमलने २६ जुलै रोजी राहत्या घरात पिक फवारणीचे औषध घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी विवाहितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी पती चेतन गोपाळ पाटील, सासरे गोपाळ देवचंद पाटील आणि सासु जिजाबाई गोपाळ पाटील रा. रायपूर ता.रावेर यांच्या विरूध्द सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर आज गुरूवारी तिघांना सावदा पोलीसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोहेकॉ आर.डी. पवार करीत आहे.

Protected Content