सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर फळे यांनी गणेश उत्सव काळात शहराच्या मिरवणूक मार्गावरून व ईद ए मिलादच्या जुलूसमार्गावरून रूट मार्च अधिकाऱ्यांसह केला होता.
दरवर्षी प्रमाणे गणेशोत्सव गणेश चतुर्थी पासून दहा दिवस मोठ्या उत्साहात सामाजिक धार्मिक, क्रीडा, कृषी, पर्यावरण पूरक व व्यसनमुक्ती या विषयावर आरास करून साजरा करण्यात येतो. यावर्षीही हा उत्सव १९ मंगळवारपासून मोठ्या उत्साहात सुरू झाला. भव्य दिव्य व सुंदर आकर्षक अशा मूर्ती २५ गणेश मंडळांनी बसवल्या असून भाविक भक्त दररोज सकाळी व संध्याकाळी मोठ्या भक्ती भावे आरती करीत असतात. या उत्सवाचे निमित्त अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात येते.
विसर्जन मिरवणूक व दुसऱ्या दिवशी होणारी ईद-ए-मिलादचा जुलूस यानिमित्त सावदा शहरात वरिष्ठ अधिकारी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर विभागाचे डीवायएसपी राजकुमार शिंदे यांच्या नेतृत्वात सपोनि जालिंदर पळे, पोउनि विनोद खांडबहाले, अनवर तडवी, शांताराम पाटील यांच्यासह दीडशे ते जणांचा पोलीस स्टॉप, सीआरपीएफ स्टॉप, दंगा नियंत्रण पथक व गृहरक्षक दलाचे जवान, महिला पोलीस कर्मचारी महिला गृह लक्ष दलाच्या महिला यांच्यासह मोठा फौज फाटा सावदा शहरात गणेशोत्सव व ईद च्या उत्सव मिरवणुकी साठी बंदोबस्तासाठी लावण्यात आलेला आहे.
गणपती विसर्जन मार्गावर तसेच ईद मिलाद जुलूस मार्गावर उपद्रव करणाऱ्यावर नजर ठेवण्यासाठी शहरात ४० प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहे. मिरवणुकीत २५मंडळांनी आपले गणेश उत्सव साजरे केले असले तरी वीस मंडळे मिरवणुकीत सहभागी होतील अशी आशा आहे.
चिनावलकर नागरिकांचे पोलीस प्रशासनाने मानले आभार
चिनावल येथे सातव्या दिवशी १५ गणेश मंडळांनी उत्साह पूर्ण वातावरणात ढोल ताशाच्या गजरात बेंजोच्या तालावर गावातून शांततेत मिरवणूक काढून पोलीस प्रशासनास सहकार्य केले. तसेच या मिरवणुकीत मुस्लिम समाजाने ही आमच्या विनंतीस मान देऊन सर्वतोपरी सहकार्य केले. त्यांचे पोलीस प्रशासनातर्फे आभार त्याच पद्धतीने सावदा शहरातील हिंदू-मुस्लिम नागरिकांना विनंती आहे की, चिनावल प्रमाणेच आपणही सर्वांनी कोणताही उपद्रव न करता शांततेच्या मार्गाने विसर्जन गणपती मिरवणूक मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलादचा जुलूस मिरवणूक शांततेत पार पाडावी व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मुक्ताईनगर विभागाचे डीवायएसपी राजकुमार शिंदे यांच्यासह सावदा पोलीस ठाण्याचे सपोनि जालिंदर पळे यांनी केले आहे.