Home क्राईम सावद्यात गावठी कट्टा बाळगणारा तरूण अटकेत

सावद्यात गावठी कट्टा बाळगणारा तरूण अटकेत

0
31

सावदा, ता रावेर प्रतिनिधी । येथे गावठी कट्टा बाळगणार्‍या येथील एका तरूणाला पोलीसांनी बस स्थानकाच्या समोर अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, सावदा बस स्थानकाच्या समोर असणार्‍या भारंबे वर्कशॉपच्या समोर रात्री साडेदहाच्या आसपास सैयद इकबाल उर्फ भुरा सैयद सलाऊद्दीन ( वय ३५; रा. मोठा आखाडा परिसर सावदा) याला सावदा पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे देशी बनावटीचा कट्टा आणि त्याच्या सोबत मॅगेझीन आढळून आले. पोलिसांनी संशयिताला अटक करून त्याच्याकडून गावठी कट्टा व मॅगेझीन जप्त केले आहे. त्याच्या विरूध्द आर्म अ‍ॅक्ट कलम ३/२५; मुंबई पोलीस अधिनियम ३७ (१); (३); १३५; भादंवि कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सावदा पोलीस स्थानकाचे सपोनि राहूल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र मोरे हे करीत आहेत.


Protected Content

Play sound