सावदा ता.रावेर (प्रतिनिधी)। शहरातील साळीबाग परिसरात प्रतिबंधित क्षेत्रात क्वारंटाईन केले असतांना बाहेर विनाकारण फिरणाऱ्या तिघांवर सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी शहरातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह म्हणून आढळून आला होता. हा व्यक्ती मुंबईहून सावदा येथे आला होता. त्यामुळे तो परिसर कंटेनमेन्ट झोन घोषीत करण्यात आला होता. दोन तरूण काही दिवसांपुर्वी मुंबईहून आले होते. त्यामुळे दोघांसह एका महिलेला होम क्वारंटाईन सर्वांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारलेला होता. २४ मे रोजी सकाळी १० ते १०.३० वाजेच्या सुमारास नगरपालिकेचे कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत साळीबाग व शाळेजवळील परिसर सील करण्यासाठी आलेले असतांना होम क्वारंटाईन असलेले तिघे लॉकडाऊनचे उल्लंघन करत विनाकारण बाहेर फिरत असतांना पोलीसांना आढळून आले. सावदा पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.