सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील सरदार वल्लभभाई पटेल उत्सव समितीच्या कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. निवड झालेल्या सदस्यांचे समाज बांधवांकडून अभिनंदन करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सावदा शहरातील सरदार वल्लभाई पटेल उत्सव समितीची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. या कार्यकारणीमध्ये अध्यक्षपदी श्री.जी. केटर्सचे संचालक सौरभ भीमराज नेमाडे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आले आहे. तर उपाध्यक्षपदी पृथ्वी चंद्रकांत भंगाळे, सचिवपदी अक्षय रघुनाथ भंगाळे, खजिनदार जयेश लक्ष्मण भारंबे आणि प्रसिद्धी प्रमुख कौशल दुर्गादास धांडे यांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या सर्व सदस्यांचे समाजबांधव व पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन केले जात आहे.