रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील रावेर येथील भूषण सुधाकरण सुरवाडकर या रेशन दुकानदाराकडे अनियमितता आढळून आल्याने त्यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, तहसिलदार रावेर , मंडळ अधिकारी सावदा व पुरवठा निरीक्षक रावेर व पथक यांनी मौजे सावदा ता . रावेर येथील साळीबाग भागातील स्वस्त धान्य दुकानाचे प्राधिकारपत्र असलेले भुषण सुधाकर सुरवाडकर यांचेकडील स्वस्त धान्य दुकान क्रमांक १२ ची तपासणी केली. यामध्ये दुकानात शासनाने नागरिकांना वितरीत करण्यासाठी देण्यात आलेल्या धान्याचे अयोग्य मार्गाने विल्हेवाट लावल्याचे तपासाअंती आढळुन आले. यामुळे त्यांच्याविरुध्द सावदा पोलिस स्टेशन येथे जिवनावश्यक वस्तु अधिनियम , १९५५ चे कलम ३ व ७ , साथीचे रोग अधिनियम १८९७ चे कलम ३, भारतीय दंड संहीता कलम १८८ आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५६ प्रमाणे पोलिस स्टेशन सावदा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.