सावदा पोलिसांनी मोटरसायकल चोरट्यास केली अटक

सावदा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील गाते गावातून मोटारसायकल चोरीस गेली होती. हि मोटारसायकल व चोरट्यास सावदा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

याबाबत दिलेल्या फिर्यादीनुसार,  नितीन विलास तायडे (वय  १९ ) हे रावेर तालुक्यातील गाते या गावी राहतात. ते  मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांनी त्यांची मोटरसायकल (क्र.एमएच १९ डीएक्स २४६२)  गुरुवार दि. १७ ऑगस्ट रोजी रात्री आपल्या घरासमोर उभी केली होती. त्यांची मोटरसायकल  १७ ऑगस्टच्या रात्री १०  ते १८ ऑगस्टच्या सकाळी ७  वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानुसार सपोनि डी.डी. इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक समाधान गायकवाड, स.फौ. सपकाळे, पो. ना. अक्षय हिरोळे, पो. कॉ. कुरकुरे यांच्या पथकाने तपास केला असता मनोज दिनकर बाऱ्हे (वय २३) व  विधी संघर्षित बालक (दोघे रा. उदळी बु. ता. रावेर ) यांनी हा गुन्हा केला असल्याचे आढळून आले. पोलीस पथकाने मनोज बाऱ्हे यास मोटारसायकलसह ताब्यात घेतले आहे. पुढील तपास  पोना सखाराम हिरवाळे  हे करीत आहेत.

 

Protected Content