सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीतर्फे “शिवराज्याभिषेक दिन” साजरा (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्ताने शिवतीर्थावर महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले.  

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती कार्यरत होती. परंतु,  कोविडमुळे  जनतेच्या सुरक्षितेच्या कारणामुळे कोणताही जाहीर कार्यक्रम न करण्याचा निर्णय समितीने घेतला होता. आज या महोत्सवाचा समारोप राज्याभिषेक दिनी करण्यात आला. याप्रसंगी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, महापौर जयश्री महाजन, उपस्थित होते.

सर्व जाती, धर्म, पंथ यांना एकत्र करून शिवजयंती साजरी करण्याचा प्रघात जळगाव शहरात आहे. मुस्लिम बांधव देखील मोठ्या संख्येने या सहभागी होतात, सर्व समाजातील लोक या महापुरुषाला मानवंदना देतात, हे सामाजिक सौहार्दाचे प्रतिक जळगाव शहरात निर्माण करून शिवजयंती समितीआपले सामाजिक उत्तरदायीत्व निभावते, असे प्रतिपादन शिवजयंती महोत्सव समितीचे समन्वयक शंभू पाटील यांनी केले. याप्रसंगी समितीचे माजी उपाध्यक्ष हाजी गफ्फारभाई मलिक यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी  समिती उपाध्यक्ष किरण बच्छाव, सचीव राम पवार, सरीता माळी कोल्हे, माजी अध्यक्ष पुरुषोत्तम चौधरी,  मुकुंद सपकाळे,  सुरेंद्र पाटील, सुरेश भाऊसाहेब पाटील, प्रमोद पाटील, खुशाल चव्हाण , अविनाश पाटील, संजय पाटील, संजय पाटील,  सुमीत पाटील, रामचंद्र पाटील, संजय सोनवणे, अविनाश बाविस्कर, धिरेंद्र पाटील, सुजीत शिंदे, नंदुआप्पा पाटील, भैय्या देशमुख, फईम पटेल आदी शिवप्रेमी उपस्थित होते.

 

 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/153977369988751

 

Protected Content