सारोळा येथील शनीधाम येथे बैल गाडी शर्यतीचे भव्य आयोजन

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील सारोळा येथील शनिधाम परिसरात बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांसह आदीची शर्यत पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

पाचोरा तालुक्यातील सारोळा येथील शनिधाम परीसरात बैल गाडी शर्यतीचे उद्घाटन कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या हस्ते ह. भ. प. भरत महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. ग्रामीण भागातील सर्वात आवडता खेळ बैलगाडी शर्यतीचा आहे. या खेळाचे भव्य आयोजन पिर बाबा यात्रे निमित्ताने  वाघुलखेडा येथील राजे मित्र मंडळ सह परीसरातील शेतकरी मित्रांनी केले होते. याप्रसंगी शनीधामचे प्रमुख ह.भ.प. भरत महाराज, सरपंच दिनकर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी आयोजक गणेश पाटील, नाना पाटील, कीशोर पाटील, संदीप भदाणे, प्रमोद पाटील, हरी पाटील, समाधान पाटील, बंटी पाटील, कॉंग्रेस शहर उपाध्यक्ष गणेश पाटील, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे उपस्थितीत होते. यावेळी सोयगाव, सिल्लोड, नांदगाव सह परीसरातील जवळपास ४० हून अधिक बैलगाडींचा समावेश होता.

Protected Content