महिलेचा खून करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा करा

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील चिंचखेडा येथील ३९ वर्षीय महिलेचा खून करणाऱ्या अटकेतील संशयित आरोपीला जलद न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदेा यांना देण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील चिंचखेडा येथील उज्वला सुरेश पाटील (वय-३९) ही महिला घरात एकटी असताना वाईट हेतूने घरात घुसून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र महिलेने नकार दिल्यामुळे त्याच्या डोक्यामध्ये लोखंडी रॉड टाकून आरोपी विशाल नाना साबळे (वय-२३) याने खून केला होता. या घटनेच्या तपास पोलिसांनी तीन तासात लावून आरोपीला अटक केली, मात्र आता या आरोपीचा खटला गतीने चालवून फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, अशा मागणीचे लेखी निवेदन महिलेच्या नातेवाईकांनी पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्याकडे केली आहे.

सदर आरोपीने काही दिवसापूर्वी गावातील एका महिला सोबत अशाच प्रकारे गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी वाद गावातच मिटविण्यात आला होता. त्यामुळे आता आरोपीचे मनोबल वाढले. त्यानंतर सदर आरोपीने थेट महिलेचा खून करण्यापर्यंत मजल मारली तेव्हाच जर याला लगाम लागला असता तर हा प्रकार झाला नसता असे प्रतिक्रिया यावेळी गावातील महिलांनी बोलताना दिली आहे.

Protected Content