सारोळा मुक्ताई सोसायटीवर परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय

मुक्ताईनगर, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील सारोळा मुक्ताई विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड ची संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सन २०२२ ते २०२७ ची निवडणुकीत परिवर्तन पॅनल जोरदार मुसंडी मारत निर्विवाद विजय संपादन केला आहे.

 

रविवार दि. ३ एप्रिल रोजी सारोळा येथे मुक्ताई सोसायटीच्या निवडणुकीत १३ पैकी १२ जागेवर परिवर्तन पॅनलने विजय संपादन केला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी आर. बी. तडवी ,व सहकार विभागातील कर्मचारी यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. तर मुक्ताईनगर पोलीस स्टेशन चे कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवत शांततेत निवडणूक पार पाडत सहकार्य केले.

विजयी उमेदवार पुढील प्रमाणे
सर्व साधारण : विनोद पांडुरंग काटे (१२१), गजानन गुलाबीसींग पाटील (१०६), ज्ञानेश्वर भीमराव गवळी (१०५), नंदा रघुनाथ काटे (१०४), संचलाल रामधन काटे (१०२), विलाससिंह जालमसिंह पाटील (१०२), अविनाश मोतीलाल काटे (९९)संदीप दगडू काटे (९९) तर वि,जा,भ,ज,व वि,मा, प्रवर्ग : सोमा गोविंदा दगडे (११०), अनुसूचित जाती जमाती : विजय सुखदेव यमनेरे (१११). इतर मागास वर्ग : काटे सुनील बाजीराव (११९). महिला राखीव : गुंफाबाई मांगो पाटील (११९), इंदूबाई सुधाकर काटे (१०७).

सर्व विजयी उमेदवार परिवर्तन पॅनल सारोळा यांचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, जिल्हा बँक संचालक रोहिणी खडसे, योगेश कोलते सर ,माजी पंचायत समिती सभापती राजेंद्र माळी यांनी अभिनंदन केले. निकलानंतर विजयी उमेदवार यांनी गावातील सर्व मतदारांचे आभार मानले.

 

Protected Content