सायकलद्वारे कोरोनाची जनजागृती करणाऱ्या तरूणाचे यावल येथे स्वागत (व्हिडिओ )

 

यावल प्रतिनिधी । देशभरात कोरानाचे थैमान घातले आहे, राज्यात याचा फटकाही बसला आहे. कोरोनाविषयी जनजागृती करण्यासाठी कोल्हापूर येथील तरूणाने चक्क सायकलवरून जनजागृती करतोय. यावल शहरात त्या तरूणाचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले.

हा तरूण आहे नितीन गणपत नावनुरकर (वय-३९) रा. आंबाळी जिल्हा कोल्हापूर.  पत्रकारांना महिती देतांना सांगितले की, आपण १ ऑक्टोबर २०२० पासून कोरोना संकटातून आपल्या राज्यातील नागरीक सुरक्षित कसे राहतील ?  याच विषयाला आपण ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या कार्यक्रमाअंतर्गत जनजागृतीच्या माध्यमातुन महाराष्ट्र राज्यात सायकलीव्दारे गावागावात फिरून आपण मास्क लावा, सोशल डिस्टींसिंगचे काटेकोर पालन करा असे बोलुन जनजागृती व्दारे सर्वसामान्या पर्यंतसंदेश पहोचवत आहे. या युवकाने 6 महीन्याच्या कालावधीत महाराष्ट्र राज्यातील कोल्हापुर , सांगली , सातारा , सोलापुर , पुणे , लातुर , अहमदनगर. औरंगाबाद , नागपुर , गडचिरोली ,भंडारा , गोंदीया, वर्धा , अमरावती , अकोला , बुलढाणा , जळगाव , धुळे , नंदुरबार असे २९ जिल्ह्याचे सायकलीव्दारे प्रवास करीत आजवर  १३ हजार५०० किलोमिटरचा प्रवास केला आहे .कोरोनाच्या सर्वाधीक गोंधळलेल्या १ ऑक्टोबर २०२०पासुन सुमारे सहा महीन्याच्या वेळेपासुन हा तरूण आपल्या कुटुंबा पासुन केवळ आपल्या राज्यातील नागरीकांना आरोग्याची घेण्याचा विधायक दृष्टीकोण ठेवुन कोरोना विषाणु संसर्गा पासुन सावध करण्यासाठी या जिद्दी तरूणाने जनजागृतीच्या माध्यमातुन केलेल्या समाजकार्याला सलाम.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/5118384011569976

 

Protected Content