जळगाव प्रतिनिधी । बनावट दारू तयार करून विक्री करणाऱ्यास आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्याच्या ताब्यातील ५० हजार रूपयांची बनावट दारू आणि दारू बनविण्याचे साहित्य हस्तगत केले आहे. त्याच्या विरोधात पाचोरा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील सामनेर येथील शेतशिवारात अवैध देशी दारू, नकली दारू बनविण्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. मिळाल्यानंतर त्यांनी आज दुपारी सापळा रचून सामनेर शिवारात संशयित आरोपी सलमान इस्माईल मेवाती (वय-२४) रा. बांबरूळ ता. पाचोरा हा आपल्या शेतात नकली दारू बनवित असतांना अटक केली. त्यावेळी पोलीसांनी अवैधरित्या देशी दारून, विदेशी नकली दारू, ५० हजार रूपये किंमतीचे स्पिरीट, बुच, रिकाम्या बाटल्या, देशी विदेशी बनावट दारूने भरलेल्या बाटल्या, मोजमाप करण्याचे साहित्य असा मुद्देमाल पोलीसांनी हस्त केला आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि स्वप्नील नाईक, पोहेकॉ शरद भालेराव, सुनील दामोदरे, पोना रामकृष्ण पाटील, पोकॉ महेश पाटील, योगश वराडे, पोका अशोक पाटील यांनी कारवाई केली. संशयित आरोपी इस्माईल यांच्या विरोधात पाचोरा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.