सात महिन्यानंतर बैठक : विविध योजनांअंतर्गत ३५० प्रकरणांना मंजुरी

 

रावेर, प्रतिनिधी ।  तहसिल २३ जानेवारीला घेतल्या बैठकीत २१४ संजय गांधी निराधारसह विविध योजनेचे मंजूर करण्यात आले आहे. तर तब्बल सात महिन्यांनी घेतलेल्या बैठकीत पुन्हा ३५० विविध प्रकरणे मंजूर करण्यात आल्याची माहिती संजय गांधीचे नायब तहसिलदार एम. जे. खारे यांनी दिली.

निराधार महिलांना शासनाचा आधार मिळावा म्हणून शासन संजय गांधी योजना,इंदरा गांधी योजना,श्रावण बाळ योजना यासह इतर योजने द्वारे निराधार महिलांना मदत करत असते. परंतु जानेवारी महिन्यात २१४ विविध प्रकरणे मंजूर केले त्यानंतर जुलैपर्यंत तब्बल १२०० प्रकरणे आले त्यातील ३५० प्रकरणे मंजूर करण्यात आले असून यासाठी अव्वल कारकुन जी. एन. शेलकर, अव्वल कारकुर आर. ए. तडवी, लिपिक वाय. व्ही .गोटीवाले, पुरूषोत्तम महाजन, आदिंचे सहकार्य लाभले.

मंजूर प्रकरणाची यादी लवकरच प्रसिध्द करू : खारे

रावेर तालुक्यात गरजु-गरीब विधवा वृध्द महिलांचे प्रकरणे तपासणी करून मंजूर करण्यात आले आहे.सर्वांना विनंती आहे थोडा अजुन धीर धरावा लवकरच सर्व नावांची यादी तयार करून प्रसिध्द केली जाईल असे संजय गांधी निराधारचे नायब तहसीदार खारे यांनी सांगितले.

वर्ष होण्यात आले तरी समितीचा अजुनही थांगपत्ता नाही
विधानसभा निवडणूक होऊन वर्ष होण्यात आले तरी सुध्दा नविन समिती नियुक्त केली गेली नाही परीणामी प्रकरणे मंजूर होण्यास विलंब होत आहे. तालुक्यातील वृध्द महिलांची आपल्या प्रकरणांच्या चौकशीसाठी पायपीट होत आहे.यामुळे त्यांना आर्थिक भुर्दड सुध्दा सहन करावा लागत आहे.

Protected Content