यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सातोद येथील शेतकऱ्याची ३५ हजार रूपये किंमतीचा बैल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील सातोद येथील शेतकरी मिलींद लक्ष्मण चोपडे (वय-४६) हे शेतकरी आहे. शेती करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे बैलजोडी आहे. २४ डिसेंबर रात्री १० ते २५ डिसेंबर रोजी सकाळी ४ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांची मालकीची ३५ हजार रूपये किंमतीचा एक बैल चोरून नेल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी त्यांनी परिसरात शोधाशोध केली परंतू बैल आढळून आला नाही. मिलींद चोपडे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजेंद्र पवार करीत आहे.